वारूळ येथील अग्नी उपद्रवाच्या घटनेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST2021-04-03T04:31:57+5:302021-04-03T04:31:57+5:30
वारूळ येथे २९ रोजी अग्नी उपद्रवाच्या घटनेत खळ्यांना आग लागून शेतकऱ्यांचे गुरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले होते. तालुक्यातील राजकीय पक्षाचे ...

वारूळ येथील अग्नी उपद्रवाच्या घटनेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात
वारूळ येथे २९ रोजी अग्नी उपद्रवाच्या घटनेत खळ्यांना आग लागून शेतकऱ्यांचे गुरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले होते. तालुक्यातील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते भेट देऊन सदरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सांत्वन करीत आहेत. या शेतकऱ्यांस तातडीने मदत मिळावी, यासाठी केशरानंद उद्योग समूहातर्फे प्रत्येकी १० पोते ठेप ज्ञानेश्वर भामरे यांच्या हस्ते देण्यात आली. ही मदत केशरानंद उद्योग समूहाचे संचालक रवीराज भामरे यांनी त्यांच्या केशरानंद ऑइल मिलची केशरानंद ब्रॅण्ड असलेली ठेप सुरेश देवराम सोनवणे, पोपट सोनू पाटील, दिलीप पंडित बोरसे, विठ्ठल लहू खैरनार, दिलीप बुधाराणे, धनसिंग जयराम पाटील, घनश्याम बाबुराव बोरसे, सखाराम पंडित कोतकर, लोटन मोतीराम पाटील या शेतकरी बांधवांना १० हजार रुपये किमतीची ठेप वाटप केली. या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित भटू मिस्त्री, दत्तात्रय दोरीक, हेंमत भदाणे, अनिल भदाणे, किशोर बेहरे, नितीन भदाणे, अशोक बेहरे, दिलीप पाटील, सागर बेहरे, घनश्याम पाटील, प्रमोद भदाणे, अभिमन्यू इशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.