आरोग्य सेवक गोकुळ राजपूत यांचा भाऊसाहेब हिरे मेडीकलतर्फे सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:24 IST2021-06-20T04:24:28+5:302021-06-20T04:24:28+5:30
जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाच्यावतीने जिल्हयात उल्लेखनीयरित्या व प्रभावीपणे रक्तदान चळवळ राबविणाºया ...

आरोग्य सेवक गोकुळ राजपूत यांचा भाऊसाहेब हिरे मेडीकलतर्फे सन्मान
जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाच्यावतीने जिल्हयात उल्लेखनीयरित्या व प्रभावीपणे रक्तदान चळवळ राबविणाºया सामाजिक कार्यकर्ते व आरोग्यसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गोकुळ राजपूत यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. अरुण मोरे, डॉ. मकरंद खान, डॉ. सुभेदार, डॉ. रानडे, डॉ. सारीका पाटील, डॉ. किर्ती रुईकर, सी. बी. साठे, निलेश सुराणा, संजय चौधरी, सुनिल देवरे, यमन देवरे, राजू महाडीक, अजय डोंगरे हे उपस्थित होते.
माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ राजपूत हे सन २००३ पासून आरोग्यसेवक म्हणून काम करीत आहेत. दरवर्षी विविध ठिकाणी रक्तदान शिबीरे आयोजित करुन जिल्हा रुग्णालयाला रक्ताच्या हजारो बॅग मिळवून दिल्या आहेत. श्री राजपूत यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाला असून ते विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थामध्ये कार्यरत आहेत.