धुळे, नंदुरबारसह खान्देशात आरोग्य सुविधा बळकट करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:41 IST2021-08-21T04:41:21+5:302021-08-21T04:41:21+5:30
दोंडाईचा : कोरोना काळात फ्रंट लाईन वर्करसह सर्वांनी चांगले काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश व ...

धुळे, नंदुरबारसह खान्देशात आरोग्य सुविधा बळकट करणार
दोंडाईचा : कोरोना काळात फ्रंट लाईन वर्करसह सर्वांनी चांगले काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश व आम्ही सुरक्षित आहोत. तिसरी लाट रोखण्यासाठी विविध वैद्यकीय उपकरणे,सोयीसाठी २३ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर झाले आहे.
दरम्यान धुळे,नंदुरबार, खान्देशला आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दोंडाईचात केले. दोंडाईचा येथे आलेल्या जन आशीर्वाद यात्रेत ते बोलत होते.
आमदार जयकुमार रावल यांचा स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या अत्याधुनिक उपकरणे व सर्व सेवासुविधानी सुसज्ज असलेली कार्डिएय ॲम्ब्यूलन्सचे लोकार्पण केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार व आमदार जयकुमार रावल, आमदार गिरीश महाजन, नगराध्यक्षा नयनकुवर रावल यांचा हस्ते करण्यात आले.
दोंडाईचा नगरपालिकेच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी सरकारसाहेब रावल होते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून-आमदार जयकुमार रावल, खा. डॉ. सुभाष भामरे,
आमदार गिरीश महाजन, अशोक उळके, नगराध्यक्षा नयनकुवर रावल, सरकारसाहेब रावल, जि.प. अध्यक्ष तुषार रंधे, आमदार काशीराम पावरा, राज्य उपाध्यक्ष बबन चौधरी, आमदार राजेश पाडवी, लक्ष्मण सावजी, भाजपा जिल्हा अध्यक्ष नारायण पाटील, कामराज निकम, जि.प. उपाध्यक्ष कुसुम निकम, वैशाली सोनवणे,नंदुरबार भाजप जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण महाजन, आरोग्य सभापती कल्पना नगराळे, जितेंद्र गिरासे, बांधकाम सभापती निखिल जाधव, उपनगराध्यक्ष नबु पिंजारी, पाणीपुरवठा सभापती वैशाली महाजन, प्रदीप कागणे, कृष्णा नगराळे, राजू धनगर आदी होते.
प्रधानमंत्री आवास योजनेचा तिसऱ्या हप्त्याचा निधीचा धनादेश देण्यात काही लाभार्थींना देण्यात आला.
नंदुरबार चौफुली ते नगरपालिकापावेतो मोटारसायकल रॅली व जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली.
यावेळी मंत्री भारती पवार म्हणाल्या की दोंडाईचा नगरपालिकेने कोरोना काळात व इतर वेळी वाखाणण्याजोगे काम केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले काम करण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सिनची निर्मिती भारताने केली असून आतापावेतो ५६ कोटी जनतेला लस दिली गेली आहे. कोरोना तिसरी लाट रोखण्यासाठी २३ हजार कोटीचे आरोग्य पॅकेज दिले आहे. आमदार जयकुमार रावल त्यांच्या निधीतून दिलेली कार्डिएक रुग्णवाहिका रुग्णाचे प्राण वाचविणार आहे.
आमदार रावल म्हणाले की, या ॲम्ब्यूलन्सचा फायदा रुग्णांना होणार आहे. दोंडाईचा नगरपालिकेने कोरोना काळात चांगले काम केले आहे. पर्यटन खात्याचा माध्यमातून मंजूर केलेला निधी आताचे राज्य शासन अन्य कामांसाठी देत असल्याचा आरोप आमदार रावल यांनी केला. आमदार गिरीश महाजन म्हणाले की, दोंडाईचा नगरपालिकेसारखी अत्याधुनिक इमारत कुठेही नाही. आरोग्य खाते महत्त्वाचे असून मंत्री भारती पवार यांनी खान्देशला झुकते माप देण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रवीण महाजन यांनी केले. मनोगत अशोक उळके यांनी केले.