शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

बसचालकांची होणार आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 10:39 PM

जिल्हाधिकारी : राजस्थानमधून विद्यार्थ्यांना आणले, स्थलांतरीत कामगारांना सिमेवर सोडले

धुळे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातर्फे स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या इच्छितस्थळी सोडणारे, तसेच कोटा (राजस्थान) येथून विद्यार्थ्यांना आणणाऱ्या बस चालकांची त्यांच्या सुरक्षितेसाठी तत्काळ आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी महामंडळाच्या विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांना दिले आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागातील विद्यार्थी हे कोटा येथे अडकले होते. त्यांना आणण्यासाठी धुळे विभागातून ७२ बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे एक हजार २४ विद्यार्थी आपापल्या घरी सुखरुप पोहोचले. तसेच ९ ते २५ मे या कालावधीत धुळे जिल्ह्यातून पायी जाणाºया श्रमिकांना गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या सीमेवर बसद्वारे सोडण्यात आले. एकूण ४८८ बसद्वारे १० हजार ८३८ मजुरांना यांच्या इच्छित स्थळी सोडण्यात आले. यादरम्यान, धुळे जिल्ह्यातील दोन बस चालकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे तपासणीअंती निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बस चालकांच्या आरोग्य तपासणीचे आदेश दिले आहेत़ या चालकांनी जीव धोक्यात घालून सेवा बजावली आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे या चालकांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ तपासणी करुन घ्यावी. त्यातून कोणी कोरोना विषाणू पॉझिटिव्ह आढळून आला तर त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य होईल़

टॅग्स :Dhuleधुळे