बाजारात मोबाइल सांभाळा; पोलिसात तक्रारी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST2021-07-07T04:44:25+5:302021-07-07T04:44:25+5:30

कोरोना महामारीच्या काळात अनेकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागल्याने अनेकजण गुन्हेगारीकडे वळले आहेत. त्यातही भुरट्या चोरट्यांचा अधिक समावेश आहे. शहरातील ...

Handle mobiles in the market; Complaints to the police increased | बाजारात मोबाइल सांभाळा; पोलिसात तक्रारी वाढल्या

बाजारात मोबाइल सांभाळा; पोलिसात तक्रारी वाढल्या

कोरोना महामारीच्या काळात अनेकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागल्याने अनेकजण गुन्हेगारीकडे वळले आहेत. त्यातही भुरट्या चोरट्यांचा अधिक समावेश आहे. शहरातील बाजारात हे चोरटे अतिशय सफाईने मोबाइल लंपास करीत आहेत. दररोज साधारणत: दहाहून अधिक तक्रारी पोलिसात दाखल होतांना दिसून येत आहे. सुरुवातीला घरातील मोठ्या व्यक्तीकडे महागडा मोबाइल असायचा मात्र कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने लहान मुलांना देखील ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे आता लहान मुलांकडे देखील १० ते १५ हजारांपर्यंतचा मोबाइल दिसून येत आहे. त्यामुळे आई वडिलासोबत बाजारात किंवा सार्वजनिक ठिकाणी जातांना मुलंदेखील मोबाइल सोबत बाळगत असल्याने चाेरटे याचा फायदा घेत मोबाइल लंपास करताना शहरातील आग्रारोड, पाचकंदील तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी चाेरीच्या घटना अधिक दिसून येतात. त्यामुळे पोलिसात दाखल झाल्याची नोंद वाढतच आहे.

Web Title: Handle mobiles in the market; Complaints to the police increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.