चार साठवण बंधाऱ्यांच्या खोलीकरणाची कामे न करता अर्धा कोटी ठेकेदार व अधिकाऱ्यांनी काढले, शेतकऱ्यांचा आरोप, उपविभागीय अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST2021-02-07T04:33:28+5:302021-02-07T04:33:28+5:30
जिल्हा परिषद लघु संचन विभागमार्फत लघुसिंचन विभाग उपविभागीय अधिकारी हितेश भटुरकर, शाखा अभियंता के.डी. देवरे यांनी कापडणे येथे ...

चार साठवण बंधाऱ्यांच्या खोलीकरणाची कामे न करता अर्धा कोटी ठेकेदार व अधिकाऱ्यांनी काढले, शेतकऱ्यांचा आरोप, उपविभागीय अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू
जिल्हा परिषद लघु संचन विभागमार्फत लघुसिंचन विभाग उपविभागीय अधिकारी हितेश भटुरकर, शाखा अभियंता के.डी. देवरे यांनी कापडणे येथे येऊन चारही साठवण बंधाऱ्यांची पाहणी करून येथील शेतकऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. सदर चौकशी अहवाल सोमवारी विभागीय कार्यालयात सुपुर्द करण्यात येणार आहे. साठवण बंधाऱ्यांचे खोलीकरणाचे कोणत्याही स्वरूपाचे कामे न करता अर्धा कोटी पैसे ठेकेदार व अधिकाऱ्यांनी काढली असून असा शेतकऱ्यांचा आरोप व तक्रारी असल्याने याच पार्श्वभूमीवर चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी कापडणे येथे येऊन सदर चारही साठवण बंधाऱ्यांची पाहणी केली आहे. तसेच गट क्रमांक १२६८ मधील शेतकरी प्रशांत गोकूळ पाटील,धर्मा महारू पाटील, मनोज मुरलीधर पाटील, ज्ञानदीप पुंडलिक पाटील, नवल नामदेव पाटील यांचे जबाब नोंदविले आहे.
प्रतिक्रिया- जि.प. धुळे लघुसिंचन विभाग शाखा अभियंता के.डी. देवरे
कापडणे येथील भात नदीवरील साठवण बंधारा क्रमांक एक, दोन भारा नाला, क्रमांक तीन दुधई नाला, क्रमांक चार धमाणे रोडालगत पांजर तलाव या चारही साठवण बंधाऱ्यांचे काम २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवारमध्ये मंजूर होते. पैकी भात नदीवरील बंधाऱ्याचे सरकारी जेसीबीमार्फत अर्धवट काम झालेले असून उर्वरित तीन बंधाऱ्यांचे काम झालेले नाही असे लेखी जबाब येथील शेतकऱ्यांनी दिले असून सरकारी आदेशानुसार सदर कामाची पाहणी करून शेतकऱ्यांचे लेखी जबाब नोंदवून सदर पाहणी केलेला अहवाल विभागीय कार्यालयात सोमवारी, मंगळवारी जमा करण्यात येणार आहे. पुढील कारवाई नियमानुसार करण्यात येईल.
प्रतिक्रिया- तक्रारदार शेतकरी प्रफुल रंगराव पाटील
खासगी ठेकेदाराने सदर विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून बंधाऱ्यांचे खोलीकरणाचे काम न करता बिले काढून घेतली आहेत. आजपर्यंत ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.
प्रतिक्रिया - शेतकरी मनोज मुरलीधर पाटील
भात नदीवरील बंधारा जलयुक्त शिवारातून जेसीबीच्या सहाय्याने खोलीकरणाचे काम अर्धवट केले आहे. चारही साठवण बंधाऱ्यांचे खोलीकरण कामे न करता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संगनमत करून खासगी ठेकेदाराला संपूर्ण रक्कम अदा केलेली आहे.
भाऱ्या नाल्यावर खोलीकरण कामाची पाहणी करताना धुळे जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाचे उपविभागीय अधिकारी हितेश भटुरकर, शाखा अभियंता के.डी. देवरे, शेतकरी प्रफुल रंगराव पाटील, मनोज मुरलीधर पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष नवल नामदेव पाटील, माजी सरपंच भटू गोरख पाटील, प्रशांत गोकूळ पाटील, जगन्नाथ पाटील, आबा पाटील, धनंजय पाटील, पिंटू बोरसे आदी शेतकरी उपस्थित होते.