दोंडाईचा शहरासह ग्रामीण भागात सर्रास गुटखा विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:23 AM2021-07-12T04:23:00+5:302021-07-12T04:23:00+5:30

महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू, गुटखा विक्री, साठेबाजीवर बंदी घालण्यात आली आहे. यात सहभागी असणाऱ्या आरोपीविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय ...

Gutkha sales in rural areas including Dondaicha town | दोंडाईचा शहरासह ग्रामीण भागात सर्रास गुटखा विक्री

दोंडाईचा शहरासह ग्रामीण भागात सर्रास गुटखा विक्री

Next

महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू, गुटखा विक्री, साठेबाजीवर बंदी घालण्यात आली आहे. यात सहभागी असणाऱ्या आरोपीविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा कडक असूनही याबाबत कडक कायदेशीर कारवाई मात्र होताना दिसत नाही. दोडाईचात टपरी, दुकान आदी ठिकाणी बिनधास्तपणे गुटखा विक्री होत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांना माहीत आहे.

दोंडाईचात किरकोळ कारवाई होते, पण मुख्य एजंट कधीच सापडत नाही, येथून जळगाव, चाळीसगाव, अमळनेर आदी ठिकाणी गुटखा पाठविला जातो, अशी चर्चा आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी तपासणी करून कारवाई होते, मात्र दोंडाईचात अन्न-औषध प्रशासनाने याबाबत तपासणी व कारवाई केल्याचे दिसत नाही. वर्षभरात किती टपऱ्या, दुकानाची तपासणी केली हे कोडे आहे. तपासणी केली तरी गुटखा त्यांना सापडत नाही, परंतु विक्री खुलेआम होते, हे जनतेला दिसते. दोंडाईचात लाखो रुपयांची गुटखा विक्री व साठवणूक उलाढाल होते. अवैध गुटखा विक्रीमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा जीएसटी बुडत असल्याचे यातील जाणकारांचे मत आहे. दोंडाईचा शहरात बेकायदेशीरपणे गुटखा विक्री-साठवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी आहे.

Web Title: Gutkha sales in rural areas including Dondaicha town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.