गुड्या खून प्रकरणातील संशयित श्याम गोयर याचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 13:13 IST2020-08-13T13:12:58+5:302020-08-13T13:13:29+5:30
रुग्णालयात निमोनियावर सुरु होते उपचार

गुड्या खून प्रकरणातील संशयित श्याम गोयर याचे निधन
धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालयात निमोनिया आजारावर उपचार घेत असलेला गुड्या खून प्रकरणातील संशयित श्याम गोयर याचे बुधवारी सायंकाळी उशिरा निधन झाले़ घटनेपासून तो फरार होता़ त्याला निमोनिया झाल्यामुळे तो हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता़ तो आला असल्याची माहिती मिळताच धुळे शहर पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रीत केले होते़ दवाखान्यात असल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलेले नव्हते़ पण, त्याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली होती़ अशातच त्याचा मृत्यू झाला आहे़ दरम्यान, या घटनेतील अन्य संशयित कारागृहात आहेत़