राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST2021-06-28T04:24:23+5:302021-06-28T04:24:23+5:30
संदेश भूमी धुळे धुळे शहरात बसस्थानकाजवळील शासकीय विश्रामगृहात असलेल्या संदेश भूमी येथे बहुजन समाज पार्टीतर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या ...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन
संदेश भूमी धुळे
धुळे शहरात बसस्थानकाजवळील शासकीय विश्रामगृहात असलेल्या संदेश भूमी येथे बहुजन समाज पार्टीतर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन सभा झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद सैंदाणे, जिल्हा प्रभारी मिलिंद बैसाणे, जिल्हा कोषाध्यक्ष रवींद्र जाधव, जिल्हा बीव्हीएफ संयोजक विजयराव मोरे, संगम मोरे, धुळे शहर विधानसभा अध्यक्ष ॲड. संदीप जावरे, विधानसभा महासचिव ॲड. सतीश अहिरे, साक्री विधानसभा प्रभारी सुरेश महीरे, विधानसभा महासचिव साहेबराव अहिरे, सचिन वाघ आदींनी अभिवादन केले.
पटेल कन्या विद्यालय
शिरपूर येथील एच. आर. पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व अभिवादन करण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य आर. बी. पाटील व पर्यवेक्षक जे. पी. पाटील यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी आर. व्ही. महाले, पी. एस. पाटील, एन. बी. पाटील, के. एल. पाटील, ए. एस. जाधव, शशिकांत देशमुख, शरद सोनवणे, राजू कोळी, अनिल साळुंखे, योगेश पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बाफना हायस्कूल फागणे
फागणे ता. धुळे येथील सी. एस. बाफना हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य दिलीप सूर्यवंशी, पर्यवेक्षक धनराज पाटील, प्रा. रघुनाथ पाटील, प्रा. भारती सूर्यवंशी आदींनी प्रतिमा पूजन करुन अभिवादन केले. राजेंद्र ढोडरे यांनी जीवन चरित्रावर माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. अरुण वाडीले यांनी केले तर विजय पाटील यांनी आभार मानले.
साक्री येथे अभिवादन
शूद्रातिशूद्र, दीनदलित, स्त्रिया व समाजातील मागास घटकांना समानतेची वागणूक मिळावी यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी उदंड कार्य केले, त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा असे प्रतिपादन इतिहास विभाग प्रमुख डॉ. एन. डी भामरे यांनी केले.
विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त अभिवादन समारंभात ते बोलत होते. अभिवादन कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे, उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. डी. पी. पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.