नेरच्या तरुणाचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST2021-06-19T04:24:17+5:302021-06-19T04:24:17+5:30
साक्रीजवळील काशीधरा शेत शिवारातील खोल विहिरीत २७ वर्षीय विवाहिता विहिरीत पडली होती. यावेळी तेथे नेर येथील तरुण जितेंद्र ...

नेरच्या तरुणाचा सत्कार
साक्रीजवळील काशीधरा शेत शिवारातील खोल विहिरीत २७ वर्षीय विवाहिता विहिरीत पडली होती. यावेळी तेथे नेर येथील तरुण जितेंद्र देवरे यांनी विहिरीच्या दिशेने धाव घेऊन त्या महिलेचे प्राण वाचविले होते. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र धनगर पाटील, नेरचे माजी सरपंच शंकरराव हिरामण खलाणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस कॉन्स्टेबल चेतन गवळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष नाना बोढरे, ग्रामपंचायत सदस्य सुनील भागवत, उद्योजक दीपक खलाणे, पत्रकार सूरज खलाणे, रावसाहेब खलाणे, भानुदास अहिरे, दिनेश अहिरे, संदीप बोरसे, हेमंत बाविस्कर, नीलेश माळी, राकेश अहिरे, आप्पा जाधव, नीलेश बोरसे, महेंद्र बाविस्कर, ज्ञानेश्वर बिलाडे, आबा धोबी, नीलेश बाविस्कर, नरेंद्र एंडाईत, संजय नहिरे, उमाकांत खलाणे, सुनील खलाणे, बंटी खलाणे, रवि कोळी आदी उपस्थित होते.