धुळे : महात्मा बसवेश्वरांना विविध कार्यक्रमांनी अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 11:23 IST2019-05-08T11:22:48+5:302019-05-08T11:23:35+5:30
शहरातील बसवेश्वर चौकात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिम पूजन केल्यानंतर वीरशैव लिंगायत समाजातर्फे दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, भाजपा जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल उपस्थित होते.

dhule
ठळक मुद्देdhule
धुळे : जिल्हा वीरशैव लिंगायत समाजातर्फे श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या ८८८ व्या जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीत येथे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते देखील प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचाºयांसह समाज बांधव उपस्थित होते. सायंकाळी महापौर चंद्रकांत सोनार व उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरवात झाली. महात्मा बसवेश्वर चौकात स्वखर्चाने पेव्हर ब्लॉक बसविल्याबद्दल संतोष लगडे यांचा सत्कार करण्यात आला.