शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

गोदामातून चोरलेले ४० क्विंटल सोयाबीन वाहनासह हस्तगत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 18:35 IST

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरची घटना : पोलिसांनी केले तिघांना जेरबंद; गुन्ह्याची कबुली

ठळक मुद्देदेशशिरवाडे शिवारातील गोदामातून ४० क्विंटल सोयाबीनची चोरी अवघ्या १२ तासांत आरोपी जेरबंद गुन्ह्याची दिली कबुली, ५ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत 

लोकमत आॅनलाईन धुळे : साक्री तालुक्यातील देशशिरवाडे शिवारातील गोदाम फोडून त्यातील चोरलेले ४० क्विंटल सोयाबीनसह वाहन असा मिळून पाच लाख ४४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पिंपळनेर पोलिसांना अवघ्या १२ तासांत यश मिळाले. चोरीची ही घटना १ एप्रिल रोजी पहाटे घडली होती. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पिंंपळनेर येथील व्यापारी सतीष कोठावदे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार त्यांनी शेतक-यांकरून खरेदी केलेले ४० क्विंटल सोयाबीन त्यांच्या देशशिरवाडे येथील गोदामात ठेवले होते. चोरट्यांनी ३१ मार्च रोजी रात्री या गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून प्रतिक्विंटल ३६०० रुपये या प्रमाणे १ लाख ४४ हजार रुपये किमतीचे ४० क्विंटल सोयाबीन चोरून नेले होते. या प्रकरणी मंगळवार २ रोजी रात्री साडेअकरा वाजता पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तत्परतेने तपास करून दत्तू रामदास पवार (५०) रा.धोंगडे, ता.साक्री ईश्वर मधुकर खैरनार (३५) मूळ रा.बल्हाणे, ता.साक्री (ह.मु.बिलदा, ता.नवापूर),  व प्रशांत साहेबराव पवार (२८) रा.बल्हाणे, ता.साक्री यांना त्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने बुधवारी पहाटे साडेपाच वाजता अटक करण्यात आली. मुद्देमाल १२ तासांत हस्तगत त्यांच्याकडून १ लाख ४४ हजार रुपये किमतीचे ४० क्विंटल सोयाबीन व ते त्याच्या वाहतुकीसाठी वापरलेला एमएच १८ एम ५०३८ या क्रमांकाचा व चार लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण ५ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल गुन्हा दाखल झाल्यापासून १२ तासांत हस्तगत केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पी.जे.राठोड, उपनिरीक्षक बी.बी. न-हे, पोलीस हेडकॉन्स्टेबल पी.डी.अमृतकर, आर.आर. राजपूत, पोलीस नाईक डी.डी. वेंदे, पोली कॉन्स्टेबल व्ही.पी. मोहने, भूषण वाघ, अंजुम शेख यांनी केली. गुन्ह्याचा तपास अद्याप सुरूच आहे. 

 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी