‘जनता कफ्ूर्य’ला चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 19:22 IST2020-09-18T19:21:26+5:302020-09-18T19:22:07+5:30
म्हसदी : कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी घेतला होता निर्णय

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसदी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या जनता कफ्यूर्ला सलग तिसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवेतील औषधांची दुकाने, रुग्णालये आणि दूध वितरण वगळता येथे १०० टक्के बंद पाळण्यात आला.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि प्रादुभार्वाला आळा बसावा म्हणून १४ रोजी सकाळी ग्रामपंचायतच्या आवारात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत १५ ते १७ सप्टेंबर असा सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.या जनता कफ्यूर्ला १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. गावातील कोणतेही वाहन रस्त्यावर आढळले नाही म्हणून येथील मुख्यरस्ता शुकशुकाट दिसत होता.पानटपरीसह सर्व दुकाने बंद असल्याने येथिल मुख्य चौक आणि बाजार पेठेत शुकशुकाट होता. बँका चालू होत्या. मात्र लोकांअभावी त्या ठिकाणी शांतता होती.अत्यावश्यक सेवा केवळ सुरू ठेवण्यात आलेल्या होत्या. दºयान १८ सप्टेंबर पासून शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस किराणा दुकान सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत सुरू राहतील.