मोफत प्रवेशाला चांगला प्रतिसाद, आरटीईच्या ७५ टक्के जागा भरल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:23 IST2021-07-12T04:23:03+5:302021-07-12T04:23:03+5:30

धुळे : बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची ...

Good response to free admission, 75% of RTE seats filled! | मोफत प्रवेशाला चांगला प्रतिसाद, आरटीईच्या ७५ टक्के जागा भरल्या !

मोफत प्रवेशाला चांगला प्रतिसाद, आरटीईच्या ७५ टक्के जागा भरल्या !

धुळे : बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी दुसऱ्यांना मुदतवाढ मिळूनही अवघे ७५ टक्केच प्रवेश पूर्ण झालेले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यावर्षीही आरटीईची प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. यावर्षी आरटीई प्रवेशासाठी १०४ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील ११७१ जागांसाठी १९४४ ॲानलाइन अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त झालेल्या अर्जांची ७ मे २१ रोजी लॅाटरी काढण्यात आली होती. त्यातून १ हजार ३८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. दरम्यान आतापर्यंत ७७३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले असून, ५७ विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्यात आलेले आहेत. तर अजूनही २२० जागा भरण्याच्या बाकी आहेत.

शाळांचे पैसे सरकार कधी देणार?

शासनाकडून आरटीई अंतर्गत परतावा वेळेवर मिळत नाही. परताव्याची रक्कम १७ हजार ६७० वरून कमी करून ती ८ हजार करण्यात आलेली आहे. तीही प्रवेशित विद्यार्थ्यांच्या आधारकार्डाच्या प्रमाणानुसार ठरविली जाणार आहे. दरम्यान शाळांचे पैसे कधी देणार असा प्रश्न संस्थाचालकांनी उपस्थित केला आहे.

यावर्षी आरटीईला माझ्या पाल्याचा नंबर लागला आहे. मात्र आम्हाला ज्या शाळेत प्रवेश मिळायला पाहिजे होता, त्या शाळेत नंबर लागलेला नाही. त्यामुळे आम्ही पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी अजून विचार करीत आहोत.

-सागर पाटील,

पालक

आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असली तरी अद्याप शाळा केव्हा सुरू होणार हे अनिश्चित आहे. इतर शाळांनी अध्यापन सुरू केले असून, यांची प्रवेश प्रक्रियाच सुरू आहे. त्यामुळे प्रवेश घेण्यास थोळा विलंब केला.

-सुदाम अहिरे,

पालक

Web Title: Good response to free admission, 75% of RTE seats filled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.