मालेगावला जाणा:या ट्रकसह 29 गुरे पकडली
By Admin | Updated: April 5, 2017 13:26 IST2017-04-05T13:26:13+5:302017-04-05T13:26:13+5:30
जनावरांची निर्दयपणे व विनापरवानगी वाहतूक करणा:या ट्रकला बुधवारी पहाटे मुंबई- आग्रा महामार्गावरील एका हॉटेलसमोर पकडण्यात आल़े
मालेगावला जाणा:या ट्रकसह 29 गुरे पकडली
धुळे, दि. 5- जनावरांची निर्दयपणे व विनापरवानगी वाहतूक करणा:या ट्रकला बुधवारी पहाटे मुंबई- आग्रा महामार्गावरील एका हॉटेलसमोर पकडण्यात आल़े ट्रकचालकासह तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आह़े ही कारवाई उपविभागीय पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या विशेष पथकाने केली़ ट्रकमध्ये 29 जनावरे मिळून आली असून याप्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े
शिरपूर येथून एका ट्रकमधुन मालेगाव येथे गुरे नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानुसार उपनिरीक्षक राम सोनवणे, मोबीन शेख, पंकज चव्हाण, नीलेश परदेशी, सुनील पाथरवट यांनी 5 एप्रिल रोजी पहाटे तीन वाजेपासुन मुंबई- आग्रा महामार्गावर तपासणी सुरू केली़ सव्वा चारच्या सुमारास एक संशयीत वाहन आल़े त्याला थांबविण्यात आल़े ट्रक चालकाला विचारणा केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली़ ताडपत्रीने झाकलेल्या ट्रकची तपासणी केली असता त्यात 29 गुरांना निर्दपणे कोंबलेले दिसून आल़े पोलिसांनी ट्रकसह ( एमएच 15 बीके 2226) 5 लाख रूपये किंमतीची 29 जनावरे ताब्यात घेतली़ तसेच ट्रक चालक निहाल खान इलीयास खान (रा़ कमलापूरा, मालेगाव), शेख इरफारन शेख सुलेमान, शेख अरमान शेख मुसा दोघे (रा़ आयशा नगर, मालेगाव) या तिघांना ताब्यात घेतले आह़े