६५ लाखांचे उदिष्टे पूर्तीचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:12 IST2019-06-04T22:11:26+5:302019-06-04T22:12:14+5:30

सामाजिक वनीकरण विभाग : पाणी दुषित, वायूदुषित अन् ध्वनी प्रदुषणाचीही समस्या

The goal of fulfilling the 65 lakhs needs | ६५ लाखांचे उदिष्टे पूर्तीचे ध्येय

dhule

धुळे : शासनाकडून सामाजिक वनीकरण विभागाला यंदा ६५.७६ लाखांचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ठ्य देण्यात आले आहे़ त्यासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत आणि इतर विभागांच्या मदतीने उद्दिष्ठ्य पूर्तीचे ध्येय पूर्ण केले जाणार आहे़
सामाजिक वनीकरण विभागामार्फत जिल्ह्यात ६५.७६ लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे़ यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाला २७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ठ्य देण्यात आले आहे. पूर्ण नियोजनासाठी वन विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. तर विविध ठिकाणी खड्डे देखील खोदण्यात आले आहेत़ या मोहिमेसाठी शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, लोकसहभागाची मदत घेऊन शासनाकडून देण्यात आलेले उद्दिष्ठ्य पूर्ण केली जाणार आहे़
शासनाकडून वनविभागाला २०१६ मध्ये नऊ लाख ७४ हजार २८७ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ठ्य देण्यात आले होते़ त्यापैकी ७५ टक्के वृक्ष जगले होती. २०१७ मध्ये चार कोटी वृक्ष लागवड उद्दिष्ठ्य देण्यात आली़ त्यापैकी ११ लाख ११ हजार ७८२ वृक्ष जगली होती़ २०१८ मध्ये १३ कोटी वृक्ष लावडीचा संकल्प करण्यात आला होता़ त्यापैकी ९८ ठिकाणी ३० लाख ३६ हजार ७१३ वृक्षांची लागवड झाली़ तर ९३ टक्के वृक्ष जगली होती़ दरम्यान चालू वर्षी २०१९ मध्ये २७ लाख वृक्षलावडीचे उद्दिष्ठ्य देण्यात आले आहे़ त्यासाठी ६५ ठिकाणी जुलैपासून वृक्ष लागवड केली जाणार आहे़ तर १ जुलैपासून वृक्ष वाटप केले जाणार असल्याची माहिती वनविभागाने दिली़

Web Title: The goal of fulfilling the 65 lakhs needs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे