शिंदखेडा तालुक्यातील विखरणच्या शेतक-याला न्याय मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:43 AM2018-01-27T11:43:38+5:302018-01-27T11:45:00+5:30

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना आश्वासन

Giving justice to the farmer of Vikharan of Shindkheda taluka | शिंदखेडा तालुक्यातील विखरणच्या शेतक-याला न्याय मिळवून देणार

शिंदखेडा तालुक्यातील विखरणच्या शेतक-याला न्याय मिळवून देणार

Next
ठळक मुद्देविखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्यावर मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.धर्मा पाटील यांच्या चार एकर शेतात ६०० आंब्याची झाड लागवड केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. शेतात विहिर देखील आहे. या प्रकल्पासाठी ५२९ हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे. त्यांनी आत्महत्त्या केल्यानंतर सरकारने देऊ केलेले १५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान नाकारले आहे

आॅनलाइन न्यूज नेटवर्क 

शिंदखेडा (जि. धुळे) :  तालुक्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्त्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी नंदुरबार     दौ-यावर असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराच चव्हाण यांनी पाटील यांच्या कुटुंबीयांची शनिवारी सकाळी दहा वाजता भेट घेतली. त्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन त्यांच्या कुटुंबीयांना दिले. 
यावेळी माजी मंत्री बाळसाहेब थोरात, खासदार रजनी पाटील, माजी मंत्री हेमंत देशमुख, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर व कार्यकर्ते  उपस्थित होते.  यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांकडून माहिती जाणून घेतली. पाच एकरच्या बदल्यात केवळ चार लाखाचा मोबदला औष्णिक वीज प्रकल्पासाठी वीज निर्मिती करणाºया यंत्रणेने त्यांना देऊ केला. मात्र, हा मोबदला योग्य नाही. वीज प्रकल्पासाठी जमीन संपादीत करणाºया यंत्रणेकडून दुजाभाव केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. याबाबत पाठपुरावा करून थकलेले विखरण येथील धर्मा पाटील यांनी मंत्रालयात सोमवार (२२ रोजी)  आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला होता. 

Web Title: Giving justice to the farmer of Vikharan of Shindkheda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.