पैसा, बंगला, गाडी द्या अन् नवऱ्याला जणू विकतच घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST2021-07-24T04:21:33+5:302021-07-24T04:21:33+5:30
जिल्ह्यासह विविध शहरांमध्ये सासरी गेलेल्या महिलांचा पैशासाठी छळ होण्याच्या तक्रारी पोलिसात दाखल झालेेल्या आहेत.त्यातील काही तक्रारी पुणे, मुंबई, डोंबिवली, ...

पैसा, बंगला, गाडी द्या अन् नवऱ्याला जणू विकतच घ्या
जिल्ह्यासह विविध शहरांमध्ये सासरी गेलेल्या महिलांचा पैशासाठी छळ होण्याच्या तक्रारी पोलिसात दाखल झालेेल्या आहेत.त्यातील काही तक्रारी पुणे, मुंबई, डोंबिवली, नाशिकसह अन्य शहरातील महिलांनी जवळच्या स्थानिक पोलिसात दाखल केलेल्या आहेत; मात्र पतीचे मूळ गाव धुळे जिल्ह्यातील असल्याने दाखल झालेले गुन्हे धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत.
हुंडा म्हणायचा की पाेराचा लिलाव?
मुलगा उच्चशिक्षित असला की वर पित्याकडून शक्यतो शिक्षणाचा खर्च व मुलाला मिळणाऱ्या वेतनाचा विचार करून वधू पित्याकडून हुंडा स्वरूपात महागड्या वस्तूची मागणी होते.
हुंड्याची पद्धत सध्या उच्चशिक्षित समाजात जास्त दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पुणे, मुंबई, नाशिकसह मोठ्या शहरांमध्ये लग्न करून गेलेल्या विवाहितांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
हुंडा देणे किंवा घेणे यासाठी केवळ वधू किंवा वर पिता जबाबदार नसून दोन्ही जण जबाबदार आहेत. त्यामुळे वधूच्या मंडळीकडून देखील हुंडा न मागता पैसे दिल्याच्या तक्रारी दिसून येत आहेत.
अशिक्षितापासून उच्च शिक्षितापर्यंत
हुंडा ही पद्धत सुरुवातीला ग्रामीण भागात जास्त प्रचलित होती; मात्र हळूहळू ही पद्धत प्रतिष्ठेची मानली गेल्याने सर्वांनी मान्य केली.
ग्रामीण भागात शेती किंवा जीवनावश्यक वस्तूच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ होतो. तर शहरी भागात चारचाकी वाहन, नाेकरीसाठी किंवा महागड्या वस्तूंच्या खरेदीसाठी मागणी हाेते.
हुंडा म्हटला की, अशिक्षित समाजाकडून मागितला जातो. अशी समज होती; मात्र अशिक्षितांपासून ते उच्च शिक्षितापर्यंत हुंडा देणे-घेणे प्रतिष्ठेचे समजले जाते.
मुलीचे माता पिताही जबाबदार, लग्नात मुलगी व जावयाला गिफ्ट देणे म्हणजे प्रतिष्ठेचे समजले जाते. त्यामुळे देणे-घेणे ही सवय लागल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. त्यासाठी वधू व वर पित्यांनी हा व्यवहार थांबविण्याची गरज आहे
-ॲड. अमित दुसाणे
सामाजिक कार्यकर्ता तथा विधीतज्ज्ञ
नवी पिढी बदलतेय...
हुंडा देणे-घेणे ही चुकीची पद्धत आहे. या पद्धतीमुळे आजपर्यत अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. त्यासाठी नवदापत्यांनी लग्नापूर्वी विचार जुळत असतील तर पुढील आयुष्य सोबत जगण्यात काही हरकत नाही.
-सोमनाथ जाधव, तरुण
मुलाच्या मंडळीकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पैशांची मागणी केली जाते. तसेच हुंडा देणे-घेणे ही परंपरा आजही सुरू आहे..
-प्रिया पाटील,
तरुणी