शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

माय बाप सरकार न्याय द्या... अन्यथा इच्छामरणाला तरी परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 11:07 PM

चिरणे :फरकाची रक्कम मिळण्यासाठी ८५ वर्षीय वृध्दांचा ८ वर्षापासून पाठपुरावा, न्यायालयाच्या आदेशाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

धुळे  :  शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांना प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने त्यांना मंत्रालयात आत्महत्या करावी लागली. आता पुन्हा चिरणे येथील भालचंद्र भावसार या ८५ वर्षीय वृद्धाने आठ वर्षांपासून पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने मुख्यमंत्र्यासह जिल्हा प्रशासनाकडे  इच्छा मरणाची  मागणी केली आहे.     शिंदखेडा तालुक्यातील चिरणे ग्रामपंचायतीत  १९५६ मध्ये  भालचंद्र भावसार हे दहा रुपये मानधन तत्त्वावर रूजू झाले. २०१५ मध्ये  भावसार यांना १५०० रुपये वेतन दिले जात होते.  कामगार वेतन कायदा २०१६ नुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन वाढीसह फरकाची रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला.  चिरणे ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने भावसार यांनी कामगार न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने भावसार यांच्या बाजूने निकाल देत ग्रामपंचायतीला वेतनातील फरकाची रक्कम ८१ हजार १२० रुपये व २०१४ ते २०१६ पर्यतचे १२ टक्के व्याज देण्याचा आदेश दिला. त्यानंतर भावसार यांना २०१७ ते २०१९ पर्यंतच्या कालावधीत १ लाख २५ हजारांपैकी केवळ ३५ हजार देण्यात आले आहेत.  तर उर्वरित ९० हजार रुपये रक्कम देण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवकांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ग्रामसेवकांसह जिल्हा प्रशासनाचे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघनचिरणे ग्रामपंचायतीकडून फरकाच्या रकमेसाठी टाळाटाळ होत असल्याने भावसार यांनी शिंदखेडा पं.स.चे गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन कामगार न्यायालयाच्या निर्णयाच्या आदेशाचा मान राखून ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास न्याय देण्याची मागणी केली होती.   मात्र, सरपंच, ग्रामसेवकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देखील न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. अखेर त्यांना मुख्यमंत्र्याकडे इच्छा मरणाची परवानगी मागण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने याची दखल घेऊन त्यांना उर्वरित रक्कम त्वरित मिळवून देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे