झोळीतून पडलेल्या मुलीस मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 21:44 IST2019-06-13T21:44:22+5:302019-06-13T21:44:47+5:30

झोळीतून पडलेली मुलगी व जीवदान देणारा युवक रवींद्र रोकडे.

The girl who got the baby got the life | झोळीतून पडलेल्या मुलीस मिळाले जीवदान

dhule

न्याहळोद : येथे रक्तदान शिबिर चालू असताना झोळीतून पडलेल्या चिमुकल्या मुलीचे प्राण वाचविण्यात एका युवकास यश आले. योग्य उपचार केल्यामुळेच रडणाºया महिलांच्या चेहºयावर हसू आले. 
गावात यमुनाबाई अमृतकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर झाले. बंधूभगिनींनी रक्तदानाचे महान कार्य केल्यामुळे कुणा रुग्णाचे  प्राण निश्चितच वाचणार आहेत. दरम्यान मात्र झोळीतून पडणाºया चिमुकली पियू जितेंद्र माळी या १४ महिन्याच्या मुलीचे प्राण दुकानदार रवींद्र रोकडे (माळी) यांनी वाचविले आहेत. आज सकाळी ही चिमुकली झोळीतून पडली. काही क्षण रडताच ती बेशुद्ध पडली, हात पांढरे पडले, घरात रडारड सुरू झाली. समोरच राहत असलेले दुकानदार रवींद्र रोकडे हे धावून आले. त्यांनी मुलीला कृत्रिम श्वास दिला, पंपिंग केले पण मुलगी प्रतिसाद देत नव्हती. पण रवींद्र यांनी आपले प्रयत्न सोडले नाही. काही मिनिटांनी ती मुलगी हालचाल करू लागली. त्यानंतर पियू मात्र सुमारे अर्धा तास रडत होती. तिचे प्राण वाचल्याने सारे आनंदित झाले तर आपण एका बालकाला जीवदान दिल्याचे समाधान रवींद्र यांच्या चेहºयावर झळकत होते.

Web Title: The girl who got the baby got the life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे