बहुतांश सार्वजनिक ठिकाणी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे युनिव्हर्सल पास महत्त्वाचा ठरणार आहे. वेबसाईटवर लसीकरणाशी संबंधित माहिती भरल्यानंतर पास मिळणार आहे.
असा मिळवा ई - पास -
१) पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.
२) त्यातील ‘ट्रॅव्हल पास फॉर व्हॅक्सिनेटेड सिटिझन्स’ यावर क्लिक करा.
३) त्यानंतर आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेला मोबाइल क्रमांक नमूद करावा. लगेचच मोबाइलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल.
४) हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाइल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसेल.
५) त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.
६) त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याचा दिनांक इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.
७) या तपशीलमध्ये ‘सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. ते मोबाइल गॅलरीतून अपलोड करता येऊ शकते किंवा मोबाइल कॅमेऱ्याद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढूनदेखील अपलोड करता येईल.
८) ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासकरिता लघुसंदेश (एसएमएस)द्वारे लिंक प्राप्त होईल.
९) लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास मोबाइलमध्ये जतन (सेव्ह) करून ठेवावा.
रेल्वे व विमान प्रवासासाठी ई-पास आवश्यक आहे. त्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. धुळे जिल्ह्यातील जे नागरिक इतर राज्यात किंवा परदेशात जाणार असतील त्यांनी युनिव्हर्सल पास डाऊनलोड करावा.
-जलज शर्मा, जिल्हाधिकारी
दोन्ही डोस घेतलेले किती?
फ्रंटलाइन वर्कर्स - ११५९४
आरोग्य कर्मचारी - ९८५६
१८ ते ४४ - ३४९५८
४५ वर्षांवरील - १२३०२१