शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

रस्ता होईना, आगरपाड्यात लालपरी जाईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 11:41 IST

राज्य परिवहन महामंडळ। ठेलारी बांधवांचा पाडा, प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर ग्रामस्थांची नाराजी

संडे हटके बातमीगणेश जैन । लोकमत न्यूज नेटवर्क बळसाणे :  साक्री तालुक्यातील आगरपाडा हे लहानसे गाव म्हणजे ठेलारी बांधवांचा पाडा़ ‘गाव तेथे रस्ता’ आणि ‘रस्ता तेथे एसटी’ या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाची एसटी धावते़ परंतु आगरपाडा या गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील लोकांचे अतोनात हाल होतांना दिसून येत आहेत़ शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध, आजारी रुग्ण, प्रसुतीसाठी जाणाºया महिलांना तर जीव मुठीत घेऊन अंतर कापावे लागते, अशी वाईट स्थिती असूनही आजपर्यंत या गावात ‘लालपरी’ अर्थात एसटी पोहचली नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली़कढरे ते आगरपाडा व बळसाणे पर्यंत रस्ता तयार असून या रस्त्यावरून एखादी तरी बस सुरू व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे़ आगरपाडा ते कढरे यादरम्यान रस्ता वाहतूकीस खराब असल्याने आणि कढरे गावापासून साधारणत: ५ ते ६ किमी पायी चालत यावे लागते़ तसेच बळसाणे व कढरे या दोन्ही गावात बसेससह खासगी वाहनांची नियमितपणे वर्दळ राहते़ कदाचित आगरपाडा गावाकडे जाण्याच्या रस्तेत सुधारणा राहिली असती तर येथील एसटी बसेस ही आगरपाड्यापर्यंत पोहचली असती तर तेथील लोकांनी ही लालपरीवर प्रवास करण्याचा आनंद घेतला असता़ खराब अशा रस्त्यांमुळे या गावाला आजही एसटीची सेवा पोहचलेली नाही़ एसटी व कुठल्याही प्रकाराचे खासगी वाहन येत नसल्याने तेथील रहिवाशांना मोटरसायकल व बैलगाडीचा वापर करुन बळसाणे अथवा कढरे गावापर्यंत पोहचून एसटीचा पुढील प्रवास करावा लागत असल्याचे ठेलारी बांधवांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़  आगरपाडा हे माळमाथा परिसरातील १०० ते १२५ घरांचे गाव आहे़ गावातील जवळपास १५ ते २० मुल , मुली शिक्षणांसाठी कढरे या गावी पायी जातात़ उन, वारा सहन करुन पाच ते सहा किमी पायीचा प्रवास शाळेच्या दिवशी विद्यार्थ्यांना रोजच करावा लागतो़ या गावात खासगी वाहतुकीचे कोणतेही साधन नाही़ या गावातील रहिवाशांना तसेच विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत असल्याने राज्य परिवहन महामंडळाचा ‘गाव तेथे एसटी’ या संकल्पनेला तडा जात आहे़ अशा अनेक समस्यांनी आगरपाडा हे गाव ग्रासलेले आहे़ तसेच गावाच्या विकासाकडे प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते आहे़ नवस फेडण्यासाठी होतेय गर्दी४आगरपाड्याच्या पायथ्याशी जोगेबा देवस्थान असून याठिकाणी पोळ्याच्या दुसºया दिवशी मोठी यात्रा भरते़ खान्देशभरातून भाविक नवस फेडण्यासाठी गर्दी करतात़ रस्त्याअभावी भाविकांना जोगेबा देवस्थान गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्रास सोसावा लागत असल्याचे भाविकांकडून सांगितले जाते़ खराब रस्त्याची अशी ही दैनाआगरपाड्यात जाण्यासाठी कढरे या गावांपासून साधारणपणे ५ ते ६ किमीचा रस्ता असून हा रस्ता पूर्णत: खराब झालेला आहे़ याठिकाणी पायी चालणे देखील अशक्य आहे़ पावसाळ्यात तर चिखल तुडवीत ग्रामस्थांना हा रस्ता पार करावा लागतो़ रस्त्यांअभावी अपघाताला ही आमंत्रण येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ अपघाताच्या आमंत्रणाला आळा घालण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष केंद्रित करुन आगरपाड्याच्या रहिवाशांना रस्ता तयार करुन एखादीतरी लालपरी अर्थात एसटीची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी अपेक्षा गावकºयांनी व्यक्त केली आहे़ याकडे साक्री तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष असल्याची वस्तुस्थिती आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे