शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

गावठी कट्यासह धुळ्यात एकाला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 13:40 IST

एलसीबी : अंबिका नगरातील तरुणाच्या मुसक्या आवळल्या

धुळे : बिलाडी रोडवर हवेत गोळीबार करणाऱ्या अंबिका नगरातील तरुणाला गावठी कट्टा, जिवंत काडतूससह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने पकडले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीची पिस्तुल, ६०० रुपयाची १ जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी ७ वाजता करण्यात आली. त्याच्या विरोधात देवपूर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल झाला.धुळे शहरातील बिलाडी रोडवरील किसान स्टार्चजवळ गावठी कट्याद्वारे हवेत गोळीबार करुन दहशत निर्माण करणारा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बिलाडी फाटा येथे फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. माहिती मिळताच या भागात तात्काळ सापळा लावण्यात आला. एक जण संशयितरित्या फिरताना मिळून आल्याने त्याची चौकशी करण्यात आली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २५ हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीची पिस्तुल मिळून आली. त्याच्यासोबत ६०० रुपये किंमतीचे १ जिवंत काडतसू असा २५ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा येथील शकील सलीम शेख (३४, हल्ली मुक्कम अंबिका नगर, धुळे, ) याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात एलसीबीचे पोलीस कर्मचारी राहुल सानप यांनी फिर्याद दाखल केली असून देवपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, उपनिरीक्षक हनुमान उगले, कर्मचारी रफीक पठाण, संजय पाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, राहुल सानप, विलास पाटील यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Dhuleधुळे