गावठी कट्यासह धुळ्यात एकाला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 13:40 IST2020-12-30T13:40:27+5:302020-12-30T13:40:50+5:30

एलसीबी : अंबिका नगरातील तरुणाच्या मुसक्या आवळल्या

Gawthi caught one in Dhule with a knife | गावठी कट्यासह धुळ्यात एकाला पकडले

गावठी कट्यासह धुळ्यात एकाला पकडले

धुळे : बिलाडी रोडवर हवेत गोळीबार करणाऱ्या अंबिका नगरातील तरुणाला गावठी कट्टा, जिवंत काडतूससह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने पकडले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीची पिस्तुल, ६०० रुपयाची १ जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी ७ वाजता करण्यात आली. त्याच्या विरोधात देवपूर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल झाला.
धुळे शहरातील बिलाडी रोडवरील किसान स्टार्चजवळ गावठी कट्याद्वारे हवेत गोळीबार करुन दहशत निर्माण करणारा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बिलाडी फाटा येथे फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. माहिती मिळताच या भागात तात्काळ सापळा लावण्यात आला. एक जण संशयितरित्या फिरताना मिळून आल्याने त्याची चौकशी करण्यात आली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २५ हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीची पिस्तुल मिळून आली. त्याच्यासोबत ६०० रुपये किंमतीचे १ जिवंत काडतसू असा २५ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा येथील शकील सलीम शेख (३४, हल्ली मुक्कम अंबिका नगर, धुळे, ) याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात एलसीबीचे पोलीस कर्मचारी राहुल सानप यांनी फिर्याद दाखल केली असून देवपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, उपनिरीक्षक हनुमान उगले, कर्मचारी रफीक पठाण, संजय पाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, राहुल सानप, विलास पाटील यांनी ही कारवाई केली.

Web Title: Gawthi caught one in Dhule with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे