नवे भदाणे गावाजवळ गॅस भरलेला टँकर उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 18:20 IST2020-04-25T18:19:07+5:302020-04-25T18:20:52+5:30
एकाचा मृत्यू

dhule
धुळे तालुक्यातील नेर जवळील नवे भदाणे गावासमोरील सुरत नागपुर महामार्गावर दुपारी २ वाजता सुरतहुन जळगांवकडे जाणारा जी़जे १२ ऐ १४२९ क्रमांकाचा गॅस भरलेला टँकर उलटला़ यात एक महिला प्रवासी जागीच ठार झाली़ तर चालक जखमी झाला आहे़ नेर पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आ. शा. ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश मोरे यांना माहीती मिळताच महामार्गावरील अपघात झालेल्या वाहनांजवळ पोहचले़. हा टॅकर धुळ्याहुन साक्री येथे जात होतो़. साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी विचारपुस करत जखमी व मयतास जिल्हा रुग्णालयात रवाना केले़