धुळ्यात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेली टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 17:23 IST2018-04-11T17:23:51+5:302018-04-11T17:23:51+5:30
आरोपींजवळून कारसह दोन तलवारी जप्त

धुळ्यात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेली टोळी गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याजवळून कारसह दोन तलवारी, मोबाईल जप्त केले आहेत. ही कारवाई आझादनगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयांनी १० रोजी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात केली.
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पहाटे पोलिसांनी पांढºया रंगाची कार (क्र. एमएच ०४-एएक्स ८५६२) संशयास्पदरित्या जातांना आढळून आली. पोलिसांनी ही गाडी अडवून त्यातील चौघांची चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलिसांनी या कारची तपासणी केली असता, त्यात दोन तलवारी, स्कु्र ड्रायव्हर, दोर, मिरचीची पावडर, चाकू आदी हत्यारे आढळून आली. दरोडा टाकण्यासाठी हे सर्वजण जात असल्याचे उघड झाल्याने, पोलिसांनी सैय्यद जाफर सैय्यद अहमद उर्फ बंगाली बाबा (वय ४७), सैय्यद उमर सैय्यद जाफर (१८, दोन्ही रा. वडजाई रोड, धुळे), मोशीनशहा सलीम शहा (२२), रफा (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यासह एका १३ वर्षीय बालकाला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी पोलीस नाईक उमेश भिवसन चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर अल्पवयीन आरोपीस चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक एच.एन. उगले करीत आहे.