त्या भुयारीत वीजेचे दिवे नसल्याने अंधारातच दर्शन घ्यावे लागते. गणरायाच्या दर्शनासाठी भुयारात नागमोडी सुमारे ७० मिटर आत जावे लागते. भुयाराची उंची ८ फुट असून रुंदी ४ फूट आहे. भुयाराच्या आत ८ बाय १० च्या २ खोल्या आहेत. एका खोलीत ‘भुयारेश्वर’ गणपती आहे. भुयारात प्रवेश करतांना उत्तरेकडे जाण्याचा भास होतो पण आपण पुर्वेस वळतो. त्याचप्रमाणे भुयारात मुर्ती दक्षिणेकडे असल्याचा भास होतो पण मुर्तीचे तोंड पश्चिमेला आहे. भुयार पूर्णत अंधारमय असल्याने ठिकठिकाणी लहान-मोठ्या आकाराच्या खिडक्या ठेवण्यात आल्या आहेत. या टेकडीवरून पलिकडेच्या काठावरील कपिलेश्वर मंदिराचा (मुडावद ता.शिंदखेडा) ध्वज येथून दिसतोभुयाराबाहेर पाण्याची विहिर देखील आहे. मंदिराच्यावर आत्माराम बाबांची समाधी आहे. त्याकाळी या परिसरात किर्तन, भजन, विवाह सोहळ्याचे तसेच विविध कार्यक्रम घेतले जात असल्याचे गावकºयांनी सांगितले. या भुयाराचा कालखंड सांगता येत नसला तरी ते शिवकालीन असावे असे सांगितले जाते. स्वातंत्र्य संग्राम काळात स्वातंत्र्यवीर या भुयाराचा आसरा घेत असल्याचेही सांगण्यात येते. या भुयारातील मुर्तीचे वैशिष्ट म्हणजे डोळे चांदीचे असून ती डाव्या सोंडेची आहे. मूर्ती पंचामृतची बनली असून आतील पोकळ भागात कापूस भरला असल्याने मूर्तीला दाबल्याबरोबर ती दाबली जाते तसेच तिला ठोकल्यावर आवाज होतो. उंची साधारणत २ फुटाची आहे. मुर्तीस शेंदूर लावलेला असून अष्टविनायक गणपतीपैकी एक, मोरगांव येथील ‘मयुरेश्वर’ गणपतीशी मिळते-जुळते हा भुयारेश्वर गणपती आहे.
मांजरोद येथील भुयारातील गणपती ‘मयुरेश्वर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:43 IST