शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

थाळनेर येथे जुगार अड्डयावर धाड, साडेतीन लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 4:00 PM

२५ जणांवर गुन्हा दाखल, कारवाईमुळे खळबळ

ठळक मुद्देपोलिसांनी पहाटेच्या सुमारास केली कारवाई २५ जणांना घेतले ताब्यातदुचाकी, मोबाईल, रोख रक्कम जप्त

आॅनलाइन लोकमतधुळे - शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत व थाळनेर पोलिसांनी संयुक्तपणे  सरजई पेट्रोलपंपाच्या मागे जुगार अड्डयावर धाड टाकून ९ दुचाकी, २२ मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ३ लाख ४३ हजाराचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी २५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई १८ रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास करण्यात आली.थाळनेर येथे जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शिरपूर व थाळनेर पोलिसांनी मध्यरात्री या जुगार अड्डयावर धाड टाकली. त्यांच्याजवळून २२ मोबाईल, ९ दुचाकी व रोख रक्कम असा एकूण ३ लाख ४३ हजार ६७० रूपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत टाकणे, रवींद्र पवार, बागले, मुकेश पावरा, खलाणे, चालक शिरसाठ, रवींद्र पाटील, शेखर बागूल यांच्या पथकाने केली. या प्रकरणी हवालदार रवींद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून थाळनेर पोलीस स्टेशनला २५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना नोटीस देवून सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडालेली आहे. 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा