गावठी कट्ट्यासह फोटो काढून व्हायरल करणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 20:35 IST2021-07-11T20:34:41+5:302021-07-11T20:35:12+5:30

चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई

Gajaad who went viral by taking a photo with Gawthi Katta | गावठी कट्ट्यासह फोटो काढून व्हायरल करणारा गजाआड

गावठी कट्ट्यासह फोटो काढून व्हायरल करणारा गजाआड

धुळे : गावठी कट्ट्यासोबत मोबाईलवर फोटो काढून तो व्हायरल केल्याचे समोर येताच धुळ्यातील कबीरगंज भागात जाऊन मोबीन शेख गुलाम गौस याला पकडून जेरबंद करण्यात चाळीसगाव रोड पोलिसांना यश आले. २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

लोखंडी गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) सोबत एका जणाने फोटो काढून तो मोबाईलवर व्हायरल केल्याचे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळाले. माहिती मिळताच त्या इसमाचा शोध घेण्यासाठी तातडीने पथक तयार करून ते रवाना करण्यात आले. धुळ्यातील सत्तारचा वाडा, रहेमत मस्जीदजवळ कबीरगंज या ठिकाणी पोलिसांचे पथक पोहोचले. माेबीन शेख गुलाम गौस याचा शोध घेऊन त्याच्या घरी जाऊन त्याचा शोध घेण्यात आला. मोबाईलमधील फोटो त्याला दाखवून गावठी कट्ट्याबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा पोलिसांना काढून दिला. त्याला अटक करून पोलीस ठाण्यात आणले. त्याच्या विरोधात पोलीस कर्मचारी स्वप्नील सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात दाखल करण्यात आले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक याेगेश ढिकले, विजय चौरे, कर्मचारी अजीज शेख, भुरा पाटील, मुक्तार शाह, हेमंत पवार, संदीप वाघ, स्वप्नील सोनवणे, सोमनाथ चौरे आदींनी ही कारवाई केली.

Web Title: Gajaad who went viral by taking a photo with Gawthi Katta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे