अखेर गाेटे पोलीस  स्टेशनला हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 14:48 IST2020-12-18T14:47:53+5:302020-12-18T14:48:38+5:30

रावल फार्म हाऊस बेकायदेशीर प्रवेश प्रकरण

Gaete finally arrived at the police station | अखेर गाेटे पोलीस  स्टेशनला हजर

dhule

धुळे :  शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथील माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या तापी काठावरील फार्म हाऊस मध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी आमदार अनिल गोटे हे स्वता शुक्रवारी दुपारी २ वाजता दोंडाईचा पेालीस ठाण्यात हजर झाले आहेत. 
धुळ्यातून कार्यकर्यासोबत दोंडाईचा पोलीस ठाण्याबाहेर पोहचल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले की, मी रावल यांच्या फार्म हाऊस गेलो होतो. मात्र गोडीतून उतरलो देखील नाही. फार्म होऊसच्या व्यवस्थापकाशी बोलून परतलो. याव्यतिरिक्त काहीही घडलेले नसतांना माझ्याविरूध्द रावल यांच्या सांगण्यावरून दोंडाईचा पोलीसात  खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होतो. त्यासाठी मी आज स्वता पोलीस ठाण्यात दाखल झालो आहे. त्यांनंतर माजी आमदार गोटे एकटे पोलीस ठाण्यात गेले. त्याठिकाणी पुढील चाौकशी सुरू आहे. दरम्यान पोलीस ठाण्याबाहेर गद्री केली आहे.

Web Title: Gaete finally arrived at the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे