Funeral mothers now goofing on WhatsApp | संस्कार देणारी माताच आता व्हॉटसअ‍ॅपवर गुंग
dhule

धुळे : मुलांवर संस्कार घडविणारी माताच मोबाईल, व्हॉटअ‍ॅप, फेसबुक, गुगल यांसारख्या सोशल मिडियात गुंंतलेली आहे़ त्यामुळे मुलांना दोष देऊन काय उपयोग, त्यामुळे आजच्या मुलांवर अंकूश ठेवता येणं, चांगले संस्कार घडविणे अशक्य झाले आहे़ त्यामुळे मुले परिवारापासून दूर होत आहे़ असे प्रतिपादन आचार्य श्री जिणमणि प्रभससूरीश्वरजी महाराज यांनी व्यक्त केले.
शहरातील अग्रवाल भवन येथे चातुमार्सानिमित्त आयोजित अध्यात्म का शंखनाद २०१९ या धार्मिक कार्यक्रमाचा समारोप रविवारी झाला़ समारोपासाठी आचार्य जिनमणि प्रथसुरीश्वरजी महाराज आले आहेत.
माणूस जन्माने क्षत्रिय, ब्राम्हण, क्षुद्र असू शकतो परंतू मानवाला कमाने महान बनता येते. मी माणूस आहे आणि भारतीय असल्याचा अभिमान देखील असला पाहिजे़ नेहमी समर्पित भावनेने काम केले पाहिजे, हेच जीवनाचे सत्य आहे. जीवन प्रसन्नतेने जगलं पाहिजे. जगत असतांना आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण न झाल्याने मानव पुन्हा दु:खी होतो. जे आहे त्यात समाधानी राहिल्यास अनेक चिंतांपासून दूर राहता येणं शक्य होणार आहे. मानव कल्याणासाठी चांगल्या संस्कारांची गरज आहे.
चातुमार्सानिमित्त सुरू असलेल्या या कार्यक्रमात जैन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेमचंद नहार, चातुर्मास समिती अध्यक्ष विनोद भंसाली, सचिव सुनिल भंसाली, विश्वस्त प्रकाशभाई शाह तसेच केयुप अध्यक्ष जितेंद्र टाटीया आदिसह भाविकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Web Title:  Funeral mothers now goofing on WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.