लाटीपाडा प्रकल्पाच्या प्रस्तावित विकास कामांसाठी निधी मंजूर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:31 IST2021-02-15T04:31:57+5:302021-02-15T04:31:57+5:30

निवेदनात म्हटले आहे की, मौजे पिंपळनेर येथे पांझरा नदीवर लाटीपाडा पांझरा प्रकल्प आहे. ...

Funds should be sanctioned for the proposed development works of Latipada project | लाटीपाडा प्रकल्पाच्या प्रस्तावित विकास कामांसाठी निधी मंजूर करावा

लाटीपाडा प्रकल्पाच्या प्रस्तावित विकास कामांसाठी निधी मंजूर करावा

निवेदनात म्हटले आहे की, मौजे पिंपळनेर येथे पांझरा नदीवर लाटीपाडा पांझरा प्रकल्प आहे. हा प्रकल्प ४० ते ४५ वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे कालवा, पोटचाऱ्या, धरणाकडील पोहोच रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. पाटचाऱ्यांची बांधकामे तुटलेली आहेत. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळण्यास अडचणी येत आहेत. डावा कालवा, पाटचारी बांधकाम दुरुस्ती व पिंपळनेर परिसरात एकही गार्डन नसल्यामुळे प्रकल्पाजवळील सांडव्याजवळ नागरिकांसाठी व मुलांच्या मनोरंजनासाठी उद्यान होणे गरजेचे आहे. त्यामुळे सदर प्रकल्पाचा पर्यटनस्थळ म्हणून समावेश करावा तसेच प्रस्तावित विकास कामे सुकापूर रोड ६३ ते मूळ धरणाकडील रस्त्याची सुधारणा होणे, मानवकेंद्र (नवापूर रोड) ते सांडव्याकडील रस्त्याची सुधारणा होणे, डावा कालवा गट नं.९४५ येथे शेतमालाच्या वाहतुकीसाठी व वहीवाटीसाठी रस्ता पुलाचे बांधकाम करणे, डावा कालवा गट नं.९४८ येथे शेतमालाच्या वाहतुकीसाठी व वहीवाटीसाठी रस्ता पुलाचे बांधकाम करणे, डावा कालवा व पाटचारी यांची दुरुस्ती त्वरित होणे, उजवा कालवा व पाटचारी यांची दुरुस्ती करणे, आदी विकास कामे प्रस्तावित करून निधी मंजूर करावा, अशी मागणी केली आहे.

Web Title: Funds should be sanctioned for the proposed development works of Latipada project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.