मिल परिसरातील दत्त मंदिर उभारण्यासाठी निधी मिळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:32 IST2021-02-15T04:32:06+5:302021-02-15T04:32:06+5:30
धुळे : शहरातील मिल परिसरात असलेल्या चक्करबर्डी भागात दत्त मंदिर उभारले जात आहे. या कामासाठी निधी मिळावा, या मागणीसाठी ...

मिल परिसरातील दत्त मंदिर उभारण्यासाठी निधी मिळावा
धुळे : शहरातील मिल परिसरात असलेल्या चक्करबर्डी भागात दत्त मंदिर उभारले जात आहे. या कामासाठी निधी मिळावा, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांना निवेदन दिले.
मिल परिसरातील सुरत बायपासजवळील चक्करबर्डी येथे ५० ते ६० वर्षांपासून दत्तप्रभूंचे जुने मंदिर आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी निधीची आवश्यकता आहे. मंदिराच्या कामासाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार शाह यांच्याकडे करण्यात आली. यावेळी लखन चाैगुले, सुनील लष्कर, सुरेश मंजुळकर, मच्छिंद्र लष्कर, दशरथ कुसळकर, अनिल तागडकर, विनीत तागडकर, श्रावण लष्कर, गाेरख शेलार, राहुल वेतल, सागर तागडकर, विनाेद लष्कर, कैलास लष्कर, साईनाथ कुसरकर, सागर लष्कर, भगवान कुळसकर, श्याम माेरे, लष्कर पिढेकर, राजू गुंजाळ आदी उपस्थित हाेते.
दत्त मंदिरासाठी निधी मिळावा, यासाठी आमदारांना निवेदन देण्यात आले.