शेतकयांमध्ये निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:16 IST2019-04-17T13:14:50+5:302019-04-17T13:16:09+5:30
मालपूर : कापूस कवडीमोल भावात विक्री केल्यानंतर दर वधारले

dhule
मालपूर : शेतकºयांचे पांढरे सोने समजला जाणारा कापूस शेतकºयांच्या घरादारातून निघाल्यानंतर चकाकू लागला आहे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे कापसाने सहा हजाराचा आकडा ओलांडला आहे. शेतकºयांना मात्र, प्रतिक्विंटल सात हजार रुपये मिळण्याची अपेक्षा होती.
खरीपातील यावर्षीचा कापूस शेतकºयांना मातीमोल भावात विकावा लागला. सुरुवातीला पाच हजार रुपये भाव होता. त्यावेळेसच बहुतांश शेतकºयांनी कापूस विकून टाकला. आता गुढीपाडव्यानंतर नव्या हंगामाची शेतकरी सुरुवात करीत असतात. म्हणून उरलेला कापूस आता येथे विक्रीसाठी काढला जात आहे. मात्र, शेवटी कापूस चकाकू लागला आहे. मात्र, असंख्य शेतकºयांकडे कापूसच शिल्लक नसल्याने निराशा दिसून येत आहे.
येथे कापसाने ६ हजाराचा आकडा पार केला आहे. मात्र, शेतकºयांना सात हजार रुपयांची अपेक्षा होती. त्यामुळे यावर्षी देखील शेतकºयांची ही अपेक्षा फोल ठरली आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील शेतकºयांच्या घरादारातून कापूस निघून गेल्यानंतर हळूहळू भाव वाढू लागल्यामुळे शेतकºयांमध्ये निराशेचे वातावरण आहे. शेतकºयांच्या घरातून व्यापाºयांच्या घरात कापूस गेल्यावरच भाव का वाढतो, असा सवाल येथील शेतकºयांना पडला आहे. किती दिवस कापूस साठवून ठेवावा, हाही प्रश्नच आहे.
नव्या हंगामातील कापूस लागवडीसाठी क्षेत्राची हंगामपूर्व मशागत सुरु करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अजून कापूस साठवून ठेवलेल्या शेतकºयांचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. यामुळे एकंदरीत यावर्षी देखील शेतकºयांना भावात तोटाच सहन करावा लागला आहे.