मस्तिष्क शिबिरात २५१ विद्यार्थ्यांना मोफत औषधोपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:24 IST2021-02-22T04:24:27+5:302021-02-22T04:24:27+5:30
कोविड कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक क्षती होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटांतील मस्तिष्क आजार असलेल्या विद्यार्थ्यांना ...

मस्तिष्क शिबिरात २५१ विद्यार्थ्यांना मोफत औषधोपचार
कोविड कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक क्षती होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटांतील मस्तिष्क आजार असलेल्या विद्यार्थ्यांना डॉ.अनिता हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मोफत औषधाचे वितरण करण्यात आले. यात धुळे ७१, साक्री २५, शिंदखेडा ३४, शिरपूर ५२ व मनपा क्षेत्रातील ६९ अशा एकूण २५१ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत औषधाचे वितरण करण्यात आले.
सदर शिबिरास गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, तसेच गटसमन्वयक भारती भामरे यांनी भेट देऊन पालकांशी औषधोपचार घेण्याबाबत विचारणा केली, तसेच औषध घेतल्यानंतर विद्यार्थ्याला काही फरक पडला का, याबाबत विचारणा करीत शिबिराला नियमित येण्याबाबत मार्गदर्शन केले. हे शिबिर मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
शिबिर यशस्वितेसाठी डायटच्या प्राचार्या प्रतिभा भावसार, प्राथमिक शिक्षणाधिकारी मनिष पवार यांच्या मार्ग॔दर्श॔नाखाली जिल्हा समन्वयक सचिन पिंगळे, भिकन बोरसे, भीमराव देवरे व विषयतज्ज्ञ अमरदीप वानखेडकर, पंडित कढरे, प्रतिभा अहिरे, गोपाल पवार सर्व॔ विषयतज्ज्ञ व विशेष शिक्षक यांनी प्रयत्न केले.