घाणेगावात तीनशे रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:27 IST2021-01-10T04:27:35+5:302021-01-10T04:27:35+5:30

या शिबीरात अस्थिरोग, बालरोग, स्त्री रोग, दंतरोग, कान, नाक, घसा, नेत्ररोग, कम्युनिटी मेडीसीन, सर्जरी आदी विभागातील एकूण २५ डॉक्टर्स ...

Free health check-up of 300 patients in Ghanegaon | घाणेगावात तीनशे रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

घाणेगावात तीनशे रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

या शिबीरात अस्थिरोग, बालरोग, स्त्री रोग, दंतरोग, कान, नाक, घसा, नेत्ररोग, कम्युनिटी मेडीसीन, सर्जरी आदी विभागातील एकूण २५ डॉक्टर्स उपस्थित होते. जवाहर मेडिकल फाउंडेशनचे चेअरमन डॉ. भाईदास पाटील, उपाध्यक्ष आमदार कुणाल पाटील, सहसचिव संगीता पाटील, डॉ. ममता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, डॉ. अरुण दोडामणी यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

या कॅम्पसाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनचे प्रशासन अधिकारी राकेश काकुस्ते, जनसंपर्क अधिकारी प्रवीण खरे, जागृती बोरसे, शरद पाटील, प्रवीण राजपूत, नाना मराठे, डॉ. नागेश्वर शेलार, डॉ. समाधान अहिरे, सरपंच रमेश शेलार, पंचायत समिती सदस्य रोहिदास महाले, अमोदे, साहेबराव महाले, किसन शेलार, दगडू महाले, गणेश वाघ, प्रभाकर शेलार, प्रकाश मासुळे, राकेश मासुळे, राजेंद्र शेलार, श्रावण महाले, सचिन अहिरे, भाउसाहेब मासुळे, योगेश सोनार, चुडामण शेलार, गोरख महाले, योगेश पाटील सैताळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Free health check-up of 300 patients in Ghanegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.