४० रुग्णांची मोफत काचबिंदू तपासणी जवाहर फाउंडेशन : जागतिक काचबिंदू दिनानिमित्त मोफत शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST2021-03-21T04:35:30+5:302021-03-21T04:35:30+5:30

जागतिक काचबिंदू दिनानिमित्ताने जवाहर मे‍डिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये गेल्या आठवड्यात ‘जागतिक काचबिंदू सप्ताह’ आयोजित करण्यात आला ...

Free Glaucoma Screening of 40 Patients | ४० रुग्णांची मोफत काचबिंदू तपासणी जवाहर फाउंडेशन : जागतिक काचबिंदू दिनानिमित्त मोफत शिबिर

४० रुग्णांची मोफत काचबिंदू तपासणी जवाहर फाउंडेशन : जागतिक काचबिंदू दिनानिमित्त मोफत शिबिर

जागतिक काचबिंदू दिनानिमित्ताने जवाहर मे‍डिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये गेल्या आठवड्यात ‘जागतिक काचबिंदू सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी नेत्ररोग विभागातर्फे रुग्णांची मोफत काचबिंदू तपासणी व उपचार करण्यात आले. वयाच्या चाळिशीनंतर अनेक रुग्णांमध्ये काचबिंदूचे प्रमाण वाढलेले दिसते. यावेळी योग्य निदान झाल्यास रुग्णांवर यशस्वी उपचार होऊ शकतात. सदर शिबिरात ४० रुग्णांची मोफत काचबिंदू तपासणी करण्यात आली. काचबिंदू तपासणीसाठी आवश्यक असणारी विविध प्रकारची उपकरणे नेत्ररोग विभागात उपलब्ध आहेत, त्यामुळे गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे अवाहन नेत्ररोग विभागातर्फे करण्यात आले आहे.

सदर काचबिंदू शिबिरास जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, डॉ. ममता पाटील, सहसचिव संगीता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. सुरेंद्र वडगावकर, प्रा. डॉ. योगेश तांबोळी, डॉ. रिद्धी शेठीया, डॉ. शीतल चंदनखेडे, डॉ. आशिष उंद्रे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Free Glaucoma Screening of 40 Patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.