धुळे येथे गुरांच्या मांसासह चारचाकी वाहन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 20:05 IST2019-04-10T20:04:05+5:302019-04-10T20:05:03+5:30

गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

Four-wheeler seized with cattle's flesh in Dhule | धुळे येथे गुरांच्या मांसासह चारचाकी वाहन जप्त

धुळे येथे गुरांच्या मांसासह चारचाकी वाहन जप्त

ठळक मुद्देपोलिसांनी दुपारी गोडावूनवर टाकला छापापोलिस येताच तेथील ५-७ जण पळू लागलेपाठलाग करून अल्पवयीन मुलासह दोघांना पकडले

आॅनलाइन लोकमत
धुळे : शहर पोलिसांनी शंभरफुटी रस्त्यावरील एका गोडावूनवर छापा टाकून गुरांचे मांस, तीन बैल व चारचाकी वाहनासह एकूण ८ लाख ८२ हजार ४५० रूपयांचा ऐवज जप्त केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोनजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील मुस्तफा रशिद अहमद अन्सारी यांच्या मालकीच्या गोडावून मध्ये गुरांची कत्तल करून ते मांस वाहतूक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार दुपारी १२.१० वाजेच्या सुमारास पोलिसांनी दोन पंचासमक्ष मुस्तफा रशिद यांच्या गोडावूनवर छापा टाकला. पोलिस आल्याचे समजताच तेथील ५-७ लोक पळू लागले. त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह साकीर कुरेशी गुलामनबी मुर्तजा कुरेशी (वय ३२, रा. वडजाईरोड धुळे) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी १ लाख २० हजार रूपये किंमतीचे गुरांचे मांस, ७ लाख ४० हजार रूपयांचे चारचाकी वाहन (क्रमांक एमएच १६-एई २३४५) यासह तीन बैल, सुरा, इलेक्ट्रीक वजनकाटा असा एकूण ८ लाख ८२ हजार ४५० रूपयांचा माल जप्त केला.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुबेर चवरे, सहायक पोलीस निरीक्षक व्ही.पी. तेजाळे, उपनिरीक्षक एस.बी. आहेर, कॉन्स्टेबल शंकर महाजन, पोलीस नाईक संदीप कढरे, कॉन्स्टेबल प्रेमराज पाटील, जोएब पठाण, सुशिल शेंडे यांच्या पथकाने केली.
याप्रकरणी पोलीस नाईक कबीर शरीफोद्दिन शेख यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

Web Title: Four-wheeler seized with cattle's flesh in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.