माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या आत्याचे कोरोनामुळे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 18:23 IST2020-08-25T18:22:29+5:302020-08-25T18:23:33+5:30

ताईसाहेब जमादार यांचा नाशिक येथे मृत्यू

Former Tourism Minister Jayakumar Rawal's uncle dies due to corona | माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या आत्याचे कोरोनामुळे निधन

dhule

दोंडाईचा- येथील प्रसिध्द उद्योगपती सरकार साहेब रावल आणि माजी आमदार बापूसाहेब रावल यांच्या भगिनी आणि माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या आत्या तसेच रावल अ‍ॅग्रो केमच्या संचालिका ताईसाहेब जमादार यांचे आज नाशिक येथे निधन झाले आहे, त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याना उपचारासाठी सुरवातीला धुळे नंतर नाशिक येथे पाठविण्यात आले होते कोरोनातुन मुक्त होत असताना त्याना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याची प्राणज्योत मावळली. त्याच्यावर नाशिक येथे मंगळवारी बंधू सरकारसाहेब रावल, भाचे माजीमंत्री आमदार जयकुमार रावल यांच्यासमोर अंत्यसंस्कार करण्यात आले़ थाळनेर येथील ब्रिटिशांशी लढा देणाऱ्या कुटुंबात ताईसाहेब जमादार यांचे लग्न झाले होते़ परंतु दुदैवाने त्याचे पती योगेंद्रसिंह जमादार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्या माहेरी दोंडाईचा येथेच राहत होत्या. त्यांनी दोंडाईचा पालिकेच्या नगरसेविका, शिरपूर साखर कारखान्याच्या संचालिका, दादासाहेब रावल उद्योग समूहातील रावल अ‍ॅग्रो केमच्या संचालिका अशा विविध पदावर काम केले होते़

Web Title: Former Tourism Minister Jayakumar Rawal's uncle dies due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे