पंचायत समितीच्या माजी उपसभापतींचे उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:47 IST2021-02-05T08:47:27+5:302021-02-05T08:47:27+5:30
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंच्यात कुरुकवाडेतर्फे सन २०१७ ते २०२० या कालावधीत झालेले विकासकामे यांची चौकशी होऊन ...

पंचायत समितीच्या माजी उपसभापतींचे उपोषण सुरू
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंच्यात कुरुकवाडेतर्फे सन २०१७ ते २०२० या कालावधीत झालेले विकासकामे यांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी यासाठी धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना १४ डिसेंबर २० रोजी निवेदन दिले होते. त्यात त्यांनी यापूर्वी संबंधित विषयावर तक्रार केली आहे. या अगोदरही त्यांनी २०१९मध्येही त्यांनी पंचायत समितीच्या आवारात उपोषण केले होते. त्यावेळी आश्वासन देऊन त्यांचे उपोषण मागे घ्यायला लावले होते. याविषयासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावठा करूनही आजपर्यंत चौकशी झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांकडून आश्वासनाशिवाय काहीच होत नसल्याने, उपोषणाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सोमवारी सकाळपासून त्यांनी पंचायत समितीच्या आवारात उपोषण सुरू केले. सायंकाळी तहसीलदार सुनील सैंदाणे, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी व गटविकास अधिकारी सोनवणे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र ते आपल्या मागणीवर ठाम असल्याने, उपोषण सुरूच होते.