वनविभागाने पकडले सागवानी लाकूड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 22:29 IST2019-09-23T22:29:22+5:302019-09-23T22:29:56+5:30
पिंपळनेर परिसर : सहा हजाराचा मुद्देमाल

वनविभागाने पकडले सागवानी लाकूड
पिंपळनेर : वनविभागाच्या कर्मचाºयांनी सापळा रचून सागवानी लाकूड जप्त केले़ जप्त केलेले लाकूड हे १८ नग असून त्याचे बाजारमुल्य सुमारे ६ हजार इतके आहे़
येथील वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार साक्री तालुक्यातील पिंपळनेरनजिक सुकापुर डांगशिरवाडे या रस्त्यावर सोमवारी पहाटे सापळा रचून सागवानी लाकडाचे तस्करी करणाºया मोटरसायकल हस्तगत करुन सागवानी सागवानी लाकडाचे १८ नग जप्त केल्याची कारवाई येथील वनविभाग वनक्षेत्रपाल ए़ आऱ माळके व त्यांच्या पथकाने केली.
यात लाकूड तस्करी करणारा इसम हा अंधाराचा फायदा घेत प्रसार झाला. सागवान लाकडाचे नग व मोटरसायकल हे जप्त करण्यात आली आहे. पिंपळनेर येथील वनविभागाचे पथक व वन क्षेत्रपाल माळके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी पहाटे सुकापुर- डांगशिरवाडे या रस्त्यावर रात्री गस्त घालत असताना संशयास्पद मोटरसायकल येताना दिसल्यावरुन पथकाने मोटरसायकलीचा पाठलाग केला़ यात मोटर सायकल स्वार वाहनासह सागवानी नग टाकून तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. वन विभागाने एकूण सहा हजाराचा मुद्देमाल जप्त करुन कारवाई केली. याप्रकरणी क्षेत्रपाल ए़ आऱ माळके, वनपाल बच्छाव, वनरक्षक पवन ढोले, वन मजूर दिनेश घुगे आदी पथकाने ही कारवाई केली आहे.