Forced looters are in custody | जबरी लूट करणारे दोघे ताब्यात
जबरी लूट करणारे दोघे ताब्यात

धुळे : ट्रक अडवून चालकाच्या खिशातून १५ हजाराची रोकड घेऊन पोबारा करणाºया दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले़ त्यांच्याकडून ४ लाख ५ हजाराचा विमल पानमसाला गुटखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़
२४ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास साक्री रोडवरील मोराणे गावाच्या शिवारात ट्रक चालकाला कारमधील तिघांनी पाठलाग करुन ट्रक थांबविण्यास भाग पाडले़ ट्रक चालक घाबरुन पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन त्याला मारहाण करण्यात आली होती़ त्याच्या खिशातून १५ हजाराची रोकड काढून घेण्यात आली होती़ यासंदर्भातील फिर्याद धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती़ 
या गुन्ह्याच्या नोंदीनंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरु केला़ मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित भूषण उर्फ भुºया राजेंद्र सुर्वे (रा़ भाईजी नगर, धुळे) याने ट्रकमधील विमल गुटख्याच्या पुड्या घरात लपवून ठेवल्याचे समोर आले़ घराची झडती घेतली असता ४ लाख ५ हजार ४०० रुपये किंमतीच्या गुटख्याच्या गोण्या आढळून आल्या़ 
भूषण राजेंद्र सुर्वे आणि सलमान रफिक शहा या दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे़ तसेच या प्रकरणातील संशयित समीर सलीम शेख आणि अमित मारुती पवार या दोघांचा शोध घेतला असता ते मिळून आलेले नाहीत़ त्यांचा शोध घेतला जात आहे़ 
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस        निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, रफिक पठाण, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, कुणाल पानपाटील, उमेश पवार, राहूल सानप, विशाल पाटील, रविकिरण राठोड, अशोक पाटील, मयूर पाटील, किशोर पाटील, गुलाब पाटील यांनी ही कारवाई केली़ दरम्यान घटनेतील फरार संशयितांचा शोध सुरु आहे़ 


Web Title: Forced looters are in custody
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.