कापडणे येथे ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST2021-02-05T08:44:44+5:302021-02-05T08:44:44+5:30
ऐतिहासिक झेंडा चौकात ध्वजारोहण : १० शाळा व १५ अंगणवाड्यांचे सामूहिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम कापडणे गावातील एच.एस. बोरसे हायस्कूल ...

कापडणे येथे ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
ऐतिहासिक झेंडा चौकात ध्वजारोहण : १० शाळा व १५ अंगणवाड्यांचे सामूहिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम कापडणे गावातील एच.एस. बोरसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आदर्श विद्यालय व विज्ञान महाविद्याल, नूतन विद्यालय, विनय विद्यालय, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, जिल्हा परिषदेच्या १ ते ५ शाळा, १५ अंगणवाड्यांतील शिक्षक व मुख्याध्यापक आर. ए. पाटील, उषाबाई पाटील, सुलक्षणा पाटील, दीपक माळी, चंद्रकांत पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाबूराव पाटील, नवनियुक्त निवड झालेले सतरा ग्रामपंचायत सदस्य नीलेश जैन, हिम्मत चौधरी, उज्ज्वला माळी, सोनी भिल, वैशाली माळी, महेश माळी, जितेंद्र भिल, अक्का भिल, वंदनाबाई पाटील, अमोल बोरसे, वैशाली पाटील, अंकिता पाटील, हरीश पाटील, आशाबाई पाटील, अलकाबाई भामरे, प्रवीण पाटील, महेश पाटील, विठोबा माळी, अंजन पाटील, नाना भामरे, मनोहर पाटील , कपिल बोरसे यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक झेंडा चौकात ध्वजस्तंभाचे पूजन ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे यांनी केल्यानंतर ध्वजारोहन प्रशासक तुषार तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर येथील ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे यांच्या हस्ते झाले.