धुळ्यात पाच लाखांचा गांजा जप्त, दोन अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 18:18 IST2019-06-27T18:17:53+5:302019-06-27T18:18:14+5:30
मोहाडी पोलिसांचा छापा : घरात पॅकिंग करुन ठेवला होता

धुळ्यात पाच लाखांचा गांजा जप्त, दोन अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील दंडेवाला बाबा नगरात धाड टाकून मोहाडी पोलिसांनी एका घरातून ५ लाखांचा गांजा हस्तगत केला़ ही कारवाई बुधवारी सायंकाळी करण्यात आली असून याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली़
शहरातील दंडेवालाबाबा नगरमधील एका घरात गांजाचा साठा करुन ठेवला असल्याची माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली़ त्यानंतर बुधवारी सायंकाळी पाटील यांनी पथकासह तेथे छापा टाकला़ घरातून ५ लाख रुपयांचा १०० किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. गांजा लहान-मोठ्या पुड्यांमध्ये पॅकिंग करुन विक्रीसाठी ठेवण्यात आला होता.
याप्रकरणी पोलिसांनी सागर मुरलीधर चौगुले (२८, रा़ दंडेवालेबाबा नगर, धुळे) आणि कालुचरण केदूचरण बेहरा (५०, रा़ जटनी, जि़ खुर्दा, ओरीसा) या दोघांना अटक करण्यात आली़
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक एम़ आय़ मिर्झा याठिकाणी उपस्थित होते. या प्रकरणी दोघांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे़