बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बनावट सोने तारणप्रकरणी पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:45 IST2021-02-05T08:45:08+5:302021-02-05T08:45:08+5:30
दोंडाईचा येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सोने तारण कर्ज प्रकरणासाठी संदीप दिनानाथ सराफ यांची पडताळणीसाठी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ...

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बनावट सोने तारणप्रकरणी पाच जणांना अटक
दोंडाईचा येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सोने तारण कर्ज प्रकरणासाठी संदीप दिनानाथ सराफ यांची पडताळणीसाठी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे ४४ प्रकरणांमध्ये बनावट सोने तारण ठेवून कर्ज देण्यात आले. त्यातून बँकेला १ कोटी ४५ लाख ४७ हजार २२६ रुपयांचा गंडा घातला हा प्रकार ५ फेब्रुवारी २०१५ ते २५ सप्टेंबर २०१९ दरम्यान झाला होता. या प्रकरणी गेल्या महिन्यात दोंडाईचा पोलीस ठाण्यात बँकेचे अधिकारी राजेश देशमुख यांनी तक्रार दिली होती. त्यावरून ३४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अविनाश भगवान पाटील, जितेंद्र पाटील, विजय पाटील, रवींद्र मधुकर सदाराव, श्याम भगवान पाटील यांना अटक केली आहे. या सर्वाना न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पाचही संशयितांनी बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते, असे तपासातून पुढे आले आहे.