आधी तुम्ही एकमत करा ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:41 IST2021-08-21T04:41:01+5:302021-08-21T04:41:01+5:30
२०१९ साली पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. या घडामोडींमुळे महाविकास आघाडी निर्माण झाली व निवडणुकीत सर्वाधिक ...

आधी तुम्ही एकमत करा ...
२०१९ साली पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. या घडामोडींमुळे महाविकास आघाडी निर्माण झाली व निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षात बसावे लागले. सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता न आल्याने भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेते व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. ती अस्वस्थता दूर व्हावी यासाठी महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याच्या घोषा भाजप नेत्यांनी सुरु केला होता. दोन वर्षात सरकार पडणार असल्याचे अनेक दावे केले गेले मात्र सरकार काही पडले नाही. आता पुन्हा राज्यातील सरकार पडण्याच्या दाव्यावरून भाजपच्या नेत्यांमधील मतभिन्नता एका कार्यक्रमात समोर आली आहे. भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन झाल्याने आता पुढील अधिवेशनापर्यंत तरी सरकार कोसळणे अशक्य आहे. मात्र सरकार कधी पडेल ते सांगताना आधी तुम्ही तरी एकमत करा अशी चर्चा सुरू झाली आहे.
- भूषण चिंचोरे