धुळे जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत‘एसएनडीटी’प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:01 IST2020-02-06T12:00:50+5:302020-02-06T12:01:10+5:30

१४ संघातून २५० विद्यार्थ्यांचा सहभाग, कलेतून स्पर्धकांनी घडविले महाराष्टÑाचे दर्शन

First 'SNDT' in Dhule district level cultural competition | धुळे जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत‘एसएनडीटी’प्रथम

धुळे जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत‘एसएनडीटी’प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :येथील नेहरू युवा केंद्रातर्फे एस.एस.व्ही.पी.एस महाविद्यालयात बुधवारी जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील १४ संघातील २५० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेत एसएनडीटी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत गायन, नृत्य, वादन, जात्यावरच्या ओव्या, गोंधळ, पारंपरिक वाद्ये आदी कलाप्रकारातून स्पर्धकांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडवले.
स्पर्धेचे उदघाटन एस.एस.व्ही.पी.एस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर पाटील यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी नेहरू युवा केंद्र जिल्हा समितीचे सदस्य यशवंत येवलेकर होते. व्यासपीठावर प्रा.डॉ. मोहन पावरा, प्रा.आर.व्ही.पाटील, पंकज शिंदे, उमा बागुल आदी उपस्थित होते.
पालेशा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पावरा नृत्यांने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. होते. परीक्षक म्हणून डॉ.अशपाक शिकलकर, प्रा.डॉ. महेंद्रकुमार वाडे यांनी काम पाहिले.प्रथम क्रमांक - एस.एन.डी.टी महिला महाविद्यालय धुळे, द्वितीय क्रमांक आर्ट सर्कल ग्रुप धुळे तर तृतीय क्रमांक एस.एस.व्ही.पी.एस आर्टस्,कॉमर्स महाविद्यालयाने मिळविला.तसेच उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक एस.एस.व्ही.पी.एस. सायन्स महाविद्यालय धुळे, तर द्वितीय क्रमांक समाजकार्य महाविद्यालय मोराणे संघाने मिळविला.
प्राचार्य डॉ. एम व्ही. पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले.

Web Title: First 'SNDT' in Dhule district level cultural competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.