धुळ्यात मनपा निवडणुकीच्या वादातून गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 12:44 IST2018-12-22T12:41:52+5:302018-12-22T12:44:36+5:30
नारायण मास्तर चाळ : जि़प़ माजी अध्यक्ष सुधीर जाधवांसह दोन जखमी

धुळ्यात मनपा निवडणुकीच्या वादातून गोळीबार
ठळक मुद्देनारायण मास्तर चाळ परिसरात दोन गटात वादगोळीबार झाल्याने दोघां जखमींवर उपचार सुरुघटनास्थळी शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनात
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिका निवडणुकीच्या वादाचे पडसाद चितोड रोड नारायण मास्तर चाळीत शुक्रवारी रात्री उमटले़ दोन गटात वाद होऊन गोळीबार केल्याची घटना घडल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव यांच्यासह दोन जखमी झाले आहेत़ त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला शनिवारी पहाटे परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने एकत्रित २४ जणांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे़ या परिसरात अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़