दूधडेअरीला आग, दोघांना दुखापत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 13:36 IST2019-04-06T13:36:07+5:302019-04-06T13:36:47+5:30

हजारो रुपयांचे नुकसान

Fire injures two, and injures both | दूधडेअरीला आग, दोघांना दुखापत

dhule

धुळे : साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या गणेश दूध डेअरीला शुक्रवारी अचानक आग लागली़ या आगीत वस्तुंचे नुकसान झाले असून दोघांना दुखापत झाली आहे़ सुदेवाने जीवितहानी झालेली नाही़
गणेश माणिक गवळी यांच्या मालकीची गणेश दूध डेअरी आहे़ या डेअरीला लागलेल्या आगीत डेअरीमधील फर्निचर, टीव्ही, फ्रिजसह सोफासेट आणि इतर साहित्य जळून खाक झाले़ या आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़
अग्नपीशमन बंबाने आग विझविली़ ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास घडली आहे़ स्पार्किंग होऊन डेअरीला आग लागली़ कॉम्प्रेसर फुटल्याने ही आग अधिकच भडकली़ या आगीत भरत गवळी आणि खंडू बोरसे यांना दुखापत झाली़ ते होरपळले गेल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले़

Web Title: Fire injures two, and injures both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे