गोदामासह किराणा दुकानाला आग, हजारोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 22:29 IST2021-04-05T22:29:01+5:302021-04-05T22:29:20+5:30

धुळे व पिंपळनेरमधील घटना

Fire at grocery store with warehouse, loss of thousands | गोदामासह किराणा दुकानाला आग, हजारोंचे नुकसान

गोदामासह किराणा दुकानाला आग, हजारोंचे नुकसान

धुळे : शहरातील वडजाई रोडवर परवीन गादी सेंटरच्या गोडावूनला आणि साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे आदर्श कॉलनीतील किराणा दुकानाला आग लागली़ यात हजारो रुपयांचे नुकसान झाले असून अग्नीशमन बंबाने आग आटोक्यात आणण्यात आली़ पोलिसात अग्नी उपद्रवची नोंद करण्यात आली़
धुळ्यातील घटना
शहरातील वडजाई रोडवर अलहेरा स्कूलजवळ रोशन हाजी यांचे परवीन गादी सेंटरचे गोडावून आहे़ या गोडावूनमध्ये कापूस आणि प्लॅस्टिकचे दाणे, खुर्ची आणि अन्य काही साहित्य ठेवलेले होते़ हे सर्व जळून खाक झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले़ सोमवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली़ आगीचे लोण हे वरपर्यंत येत होते़ ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ आगीचे वृत्त कळताच महापालिकेच्या अग्नीशमन बंबाने सहा फेऱ्या मारुन आगीवर नियंत्रण मिळविले़ चाळीसगाव रोड पोलिसात अग्नी उपद्रवची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते़
पिंपळनेरमधील घटना
पिंपळनेर येथील आदर्श कॉलनी मधील साईबाबा मंदिर समोरील योगेश धरमदास मराठे यांचे श्रद्धा किराणा व जनरल स्टोअर्स आहे़ या दुकानात सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने आगीचे व धुळीचे लोण बाहेर येत असल्याचे घर मालक मनोज बिरारीस व नागरिकांच्या लक्षात आले. दुकान मालक मराठे हे बाहेरगावी गेले असल्यामुळे त्यांना या ठिकाणी येण्यासाठी उशीर होत असल्याने नागरिकांनी दुकानाचे कुलूप तोडून बोरिंग सुरू करून आग आटोक्यात आणली़ आग विझविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले़ या आगीत किराणा मालाचे हजारोचे नुकसान झाले़ सुदैवाने जीवित हानी झालेली नाही़

Web Title: Fire at grocery store with warehouse, loss of thousands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे